By  
on  

अनलॉकमध्ये आर्या आंबेकर रमलीये रेकॉर्डिंगमध्ये

ठप्प झालेल्या अनेक गोष्टींना अनलॉकमध्ये चालना मिळताना दिसत आहे. सिनेसृष्टीही हळूहळू बदलत आहे. व्यवहार पुर्वीइतके नसले तरी ब-याच अंशी सुरु झाले आहेत. अभिनेत्री गायिका आर्या आंबेकरही न्यु नॉर्मलच्या ट्रेंडला फॉलो करताना दिसते आहे. आर्याने नुकताच तिचा एक रेकॉर्डिंग करतानाचा फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे.

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आर्या म्हणते, ‘ अनलॉकच्या प्रक्रियेला धडक्यात सुरुवात. उत्तम रेकॉर्डिंग सेशन. एक सुरेख गाणं तुमच्या भेटीला येणार आहे लवकरच!’  आर्या आता लवकरच नव्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. यापुर्वी ती ऑनलाईन मैफिलीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive