By  
on  

'मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय, तिथे देवी जागृत आहे : केदार शिंदे

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. करोनाबाधितांच्या संख्येबरोबर मृतांच्या संख्येतही दररोज वाढ होताना दिसत आहे. अजूनही आपण करोनावर यशस्वी मात केलेली नाही

न्यूझिलंडमध्ये गेल्या 100 दिवसांत एकही करोना रुग्ण आढळला नसून तेथील करोनामुक्ती धोरणांंचं जगभर कौतुक होत आहे. तसंच विशेष करुन न्यूझीलंडच्या महिला पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांचंही खुप कौतुक जगभर होत आहे. मराठी सिनेसृष्टीचे प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. विविध सामाजिक आणि ज्वलंत विषयांवर ते आपलं परखड मत व्यक्त करताना पाहायला मिळतात. केदार यांनी न्यूझीलंडवरुनच आपल्या सरकारला टोमणा देणारं एक ट्विट नुकतंच केलं आहे. 

केदार शिंदे म्हणतात,मला #NewZealand इथे जाऊन रहायचयं. कसं शक्य माहीती नाही. या १०० दिवसात तिथे एकही #Corona बाधित रूग्ण नाही. महिला पंतप्रधान आहे. देवी तिथे जागृत आहे. आम्ही इथे फक्त #बेटीपढावबेटीजगाव चे फतवेच काढणार!!

 

 

यापूर्वीसुध्दा केदार शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांवर ताशेरे होते. करोनाच्या बातम्या हद्दपार केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे करोनाविषयक लोकांच्या मनातली असुरक्षिततेची भावना निघून जाई 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive