By  
on  

Birthday Special : या मराठी सिनेमात सुनील शेट्टींनी साकारली होती ही भूमिका

खलनायकी अंदाज असो किंवा साधा-भोळा हिरो किंवा मग विनोदाच्या आपल्या स्टाईलने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारा हिरो. या सर्व भूमिका बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टी लिलया पार पाडता. त्यांच्या प्रत्येक सिनेमाचे अगणित चाहते आहेत. आज त्यांच्या वाढिवसानिमित्त एका गोष्टीबद्दल जाणून घेऊयात, ते म्हणजे सुनील शेट्टी यांनी 2018 साली मराठी सिनेमात पदार्पण केलं होतं आणि यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 

अ.ब.क. ह्या सिनेमातून सुनील शेट्टी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. हा सिनेमा पाहण्यातून मनोरंजन तर होतंच, शिवाय सरकारी उपक्रमांची माहितीही मिळते. हा सिनेमा बेटी बचाओ, बेटी पढाओ या उक्तीवर आधारित असल्याचं पाहायला मिळतं. 

सुनील शेट्टींनी बाप्पा ही कुख्यात गुंडाची व्यक्तिरेखा सिनेमात साकारली आहे.त्यांचा एक खास सीन या सिनेमात आहे. सुनील शेट्टी यांच्यासोबतच अभिनेत्री तमन्ना भाटियासुध्दा पाहुणी कलाकार म्हणून झळकली आहे. 

 

परंतु सामाजिक संदेश देणा-या या अ.ब.क. सिनेमाला बॉक्स ऑफीसवर आणि समिक्षकांकडूनही म्हणावं तितकं यश मिळालं नाही. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive