By  
on  

या नव्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार पुष्कर जोग, पाहा व्हिडीओ

सोशल मीडिया म्हणजे व्यक्त होण्याचे माध्यमआहेत . #JogBolnaar  या हॅशटॅग च्या माध्यमातून अभिनेता पुष्कर जोग कायम व्यक्त होत असतात . आता पुष्कर जोग व्हिडिओ फॉरमॅट मध्ये व्यक्त होण्यासाठी  युट्युबवर दमदार एंट्री करत आहेत . 

नुकतेच त्यांनी याबाबतची घोषणा आपल्या इंस्टाग्राम हॅन्डलवरून केली आणि आपल्या चाहत्यांना एक छान सरप्राइज दिले . कारण मुळातच चाहत्यांना आपला लाडका हिरो काय करतो त्याच्या ऍक्टिव्हिटीज काय असतात , त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक असतात .

पुष्कर जोगची  लिम्का बुक ऑफ  रेकॉर्डमध्ये उत्तम ब्रेक डान्ससाठी नोंद आहे . तर लॉकडाऊनमध्ये पुष्करचा  एका NGO  साठी केलेला डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता . 

आपल्या डान्स व्हिडिओच्या घोषणेमध्ये पुष्कर म्हणतो की , प्रवास वर्णन , वर्कआउट, डान्स व्हिडीओ,  चित्रपट , वेब सिरीज या व अशा अनेक विषयांवर मी या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून व्यक्त होणार आहे ,त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांमध्ये या युट्युब चॅनेल बद्दल उत्सुकता वाढली आहे . 

पुष्कर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खुप मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतो.  मराठी बिग बॉसमुळे तर त्याचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच त्याच्या युट्यूब चॅनेलची त्यांच्यासाठी ही आनंदवार्ताच आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive