By  
on  

‘राहत साहेब तुमची खुप आठवण येईल’ म्हणत सचिन पिळगावकर यांनी शेअर केला व्हिडियो

प्रसिद्ध शायर गझलकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. ते ७० वर्षांचे होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. त्यानंतर अनेक कलाकार राहत इंदौरी यांना श्रद्धांजली वहात आहेत. 
अभिनेता सचिन पिळगावकर यांनीही एक व्हिडियो शेअर करत राहत इंदौरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Rahat Indori Saab

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar) on

 

‘राहत साहेब तुमची खुप आठवण येईल. शायरी तुम्हाला मिस करेल. तुम्ही जे काही लिहिलं आहे ते आमच्यासोबत कायम राहील. तुमच्यावर कायमच प्रेम करत राहू...’. इंदोरच्या ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये राहत इंदौरी यांच्यावर इलाज चालू होते. आपल्या प्रकृतीची माहिती वेळोवेळी सोशल मिडियावर देत राहू असंही त्यांनी आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये म्हणलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive