मयुरी देशमुखने पतीच्या मृत्यूनंतर शेअर केली ही भावनिक पोस्ट
अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केल्याच्या बातमीने खळबळ उडाली. आशुतोष भाकरेची ही अशी अकाली एक्झिट संपूर्ण मराठी सिनेविश्वाला हादरवून गेली. आशुतोष हा ३२ वर्षांचा होता. तो डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचारही सुरु होते. पण या दरम्यानच त्याने आत्महत्या केली. मयुरीने नुकतच एक पोस्ट शेअर करत त्याची आठवण शेअर केली आहे.
A post shared by Mayuri :) (@mayurideshmukhofficialll) on
‘ मी तुझ्या वाढदिवसाचा हौसेने केलेला केक खाण्याआधीच तू निघून गेलास. तू तुझ्या जवळच्या लोकांसमोर अनेक प्रश्न ठेवून गेला आहेस. तुझा डिप्रेशनसोबतचा मोठा लढा मला माहिती आहे. पण गुणी बाळ माझं ते या लढ्याच्या अखेरच्या टप्प्यात असतानाच तू आम्हाला सोडून गेलास.’
तू थोडसं धाडस दाखवलं असतंस तर एक उत्तम आयुष्य आपल्या समोर होतं. मी आई, बाबा आणि अभि तुझ्यावर खुप प्रेम करत राहू. तू जिथे आहेस तिथे सुखात रहा.’ अशा आशयाची पोस्ट तिने सोशल मिडियावर शेअर केली आहे.