गणेशोत्सवावर आधारित ‘आप्पा आणि बाप्पा’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

यंदा करोना संकटातही बाप्पाचं साधेपणाने तरीसुध्दा जल्लोषात आगमन झालं आहे. गणेशोत्सवाच्या काळातल्या या क्षणांचा आनंद द्विगुणित करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा धमाल  चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

मराठी माणसांचं आणि सणांचं हे वेगळं नातं आहे. पण अलीकडच्या काळात हे सण साजरा करण्याचे स्वरूप बदलत चाललेले दिसते आहे. धर्म, संस्कार, विधी-परंपरा, नातेसंबध या संज्ञांना  तिलांजली देत गोंगाटी सादरीकरणाकडे आणि वारेमाप उधळपट्टी करण्याकडे जनसामान्यांचा कल दिसतोय. सण आणि उत्सवासंबंधीची आजची वास्तविकता यावर अतिशय मार्मिक, परखड तरीही मनोरंजक प्रकाशझोत ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटातून टाकण्यात आला आहे. दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, सुबोध भावे यांच्यासोबत संपदा कुलकर्णी, उमेश जगताप, शिवानी रांगोळे आदि कलाकार या चित्रपटात आहेत.

‘आप्पा आणि बाप्पा’ थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वर नक्की पहा. 

Recommended

Loading...
Share