By  
on  

अभिनेत्री अदिती गोवीत्रीकरला करोनाची लागण

मराठी सिनेविश्व आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रसिध्द मॉडेल-अभिनेत्री म्हणजे  डॉ.अदिती गोवित्रीकर .अदितीला करोनाची लागण झाल्याचं समजतं आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार ती घरीच क्वारंटाईन असून तिच्यावर वैद्यकीय मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार सुरु आहेत. तसंच अदिती वांद्रे येथील ज्या इमारतीत राहते ती इमारतसुध्दा खबरदारी म्हणून पालिकेकडून सील करण्यात आली आहे. 

मिडीया रिपोर्ट्सनुसार, काहि दिवसांपूर्वीच अदितीने तिच्या घरी काहि मित्र-मंडळींसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ह्या पार्टीत अभिनेत्री मलायका अरोरासुध्दा सहभागी झाली होती. आपल्याला माहितच आहे, काही दिवसांपूर्वीच मलायका ही करोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर आता अदितीलासुध्दा करोना झाल्याचं समोर येतंय. 

 

अदिती गोवीत्रीकरने करोनाची लागण झाल्यानंतर एका वेबसाईटला मुलाखत दिली. ती सांगते, माझ्या शरीरात फक्त  थोडी कणकण जाणवते आहे . 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive