प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन

By  
on  

अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे निधन. वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आदित्य पौडवाल हा अनेक महिने आजारी होता. त्याचं मूत्रपिंड निकामी झाल्याने त्याची प्राणज्योत मालवली, असं वृत्त आहे.

आदित्यने आपली आई अनुरादा यांच्यासारखाच संगीतत क्षेत्रात कार्यरत होता. त्यानेसुध्दा अनेक भजनं गायली आहेत. याशिवाय सर्वात कमी वयाचा संगीत दिग्दर्शक म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉ्र्डमध्येसुध्दा आदित्यचं नाव नोंदवलं गेलं होतं. 

वयाच्या ६ व्या वर्षापासूनच आदित्य उस्ताद अल्ला रखा  यांच्याकडे तबला वादनाचे धडे घ्यायचा. आदित्यने त्याचं म्युझिकमधील डिप्लोमा न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केला होता.

आदित्य हा अरुण व अनुराधा पौडवाल यांचा मुलगा. बहिण कविता पौडवाल आणि आई अनुराधा पौडवाल यांच्यासह आदित्य. 

 

Recommended

Loading...
Share