By  
on  

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिध्द आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झालं आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांची प्राणज्योत मालवली. करोनावर उपचार घेत असलेल्या आशालता या व्हेंटिलेटरवर होत्या. आज सकाळी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

आशालता यांनी अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. आई-सासू या भूमिकांसाठी त्या खास ओळखल्या जात. नुकत्याच त्या मालिकांकडे वळल्या होत्या. आई माझी काळूबाई’ या नव्याने सुरु झालेल्या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत होत्या. . मात्र या सेटवर त्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. साता-यातील रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचं आज निधन झालं

 

 

दरम्यान, आशालता यांच्या शेवटच्या क्षणी अभिनेत्री अलका कुबलसोबत होत्या असं समजतंय. या मालिकेच्या निमित्ताने तब्बल अनेक वर्षांनी या दोघी एकत्र झळकत होत्या. माहेरची साडी या दोघींची प्रमुख भूमिका असेलल्या सिनेमाने मराठी मनोंजनविश्वात अनेक विक्रम रचले. 

आशाताईंच्या जाण्याने मराठी मनोरंजनविश्वाची कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना पिपींगमून मराठीतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली. 

Recommended

PeepingMoon Exclusive