आशालता यांच्यासाठी रेणुका शहाणेंची भावनिक पोस्ट , जाणून घ्या

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं करोनामुळे आज पहाटे साता-यातील रुग्णालयात निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या.त्यांच्या जाण्याने अवघ्या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी  आणि हिंदीतील प्रतिभावान अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आशालता यांच्या निधनावर ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. 

‘आज फार हतबल झालेय. कोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला. आशालता ताई अनंतात विलीन झाल्या. अत्यंत मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, उत्तम कलाकार. मला नेहमीच बाळा म्हणत आशीर्वाद देणाऱ्या आशालता ताईंच्या आत्म्याला शांती लाभो’, अशा शब्दांत रेणुका यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

 

 

आशालता यांनी अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. आतापर्यंत त्यांनी 100 हून अधिक मराठी सिनेमांमध्ये काम केलं.  आई-सासू या भूमिकांसाठी त्या खास ओळखल्या जात. नुकत्याच त्या मालिकांकडे वळल्या होत्या. 

आई माझी काळूबाई’ या नव्याने सुरु झालेल्या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत होत्या. . मात्र या सेटवर त्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. साता-यातील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

‘उंबरठा’, 'माहेरची साडी' ‘सूत्रधार’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘वहिनीची माया’ हे आशालता यांचे गाजलेले सिनेमे. 

Recommended

Loading...
Share