चलाओ ना नैनो से बाण रे…! पाहा अपूर्वा नेमळेकरचे हे दिलखेचक फोटो

By  
on  

'रात्रीस खेळ चाले- 2'  ह्या छोट्या पडद्यावरच्या प्रसिध्द मालिकेने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण या मालिकेत शेवंता साकारणा-या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची लोकप्रियता मात्र  तसूभरही कमी झालेली नाही. 

शेवंता साकारुन महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळकर सोशल मिडीयावर भलतीच एक्टीव असते. एकापेक्षा एक सुंदर आणि मनमोहक फोटोशूटमधून ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. 

 

अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरचा  आज स्वतंत्र मोठा असा चाहता वर्ग आहे. 

 

 

अपूर्वाचं स्वत:चं युट्यूब चॅनलही आहे, त्यालासुध्दा रसिकांनी भरभरुन दाद दिली आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती विविध व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते. 
 

Recommended

Loading...
Share