अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने दिला मालिकांच्या निर्मात्यांना सेटवर काळजी घेण्यासंदर्भात निर्वाणीचा इशारा

By  
on  

‘आई माझी काळूबाई’ या मराठी मालिकेच्या सेटवरील २२ कलाकार व क्रू मेंबर्संना करोनाची लागण झाली आहे. या सेटवरच ज्येष्ठ अभिनेती आशालता वाबगावकर यांचा करोनाने मृत्यू झाला. यामुळे मालिकेच्या  सेटवर होत असलेला हलगर्जीपणा पुन्हा समोर आला आहे. आशालता यांच्या मृत्यूमुळे अनेक मराठी कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने एक परिपत्रक जारी करून याबाबत स्पष्ट केलं आहे. यामध्ये त्यांनी कलाकारांच्या आरोग्याची पुरेशी काळजी सेटवर न घेतली गेल्यास शुटिंग थांबवण्याचा इशारा दिला आहे. ‘लॉकडाऊननंतर काही अटींवर शासनाने शुटिंगला परवानगी द्यावी यासाठी निर्मात्यांनी पाठपुरावा केला होता. पण आता काही निर्माते शासनाने आखुन दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे आता भरारी पथकं स्थापन करून अशा निर्मात्यांवर नजर ठेवली जाईल.’ असा इशारा अखिल भारतीय चित्रपट महामंड्ळाने दिला आहे. 

 ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर साताऱ्याला आल्या होत्या. त्याच ठिकाणी त्यांना करोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

Recommended

Loading...
Share