माऊली फेम या अभिनेत्रीची अनुरागबद्दलची 'ती' जुनी पोस्ट व्हायरल
दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात बॉलिवूड अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा गुन्हा वर्सोवा पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल केला. तिच्या वकीलांनी पोलिसांसमोर काही पुरावेसुध्दा सादर केले आहेत. तेव्हा पुढील तपासानंतरच काय ते सिध्द होणार आहे, पण त्यानमुळेच बॉलिवूडच्या प्रसिध्द दिग्दर्शकावर या मी टूच्या आरोपांचे शिंतोडे उडल्याने तो प्रकाशझोतात आला आहे.
पण याच दरम्यन एका मराठी सिनेमाच्या अभिनेत्रीने अनुरागविषयी केलेली एक जुनी पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे. रितेश देशमुख स्टारर माऊली या मराठी सिनेमात झळकलेली अभिनेत्री सय्यामी खेर हिने अनुरागच्या चोक्ड- पैसा बोलता है या सिनेमामध्ये लीड भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री सय्यामी खेरची जुनी पोस्ट चर्चेत आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने ती एकदा अनुराग कश्यपच्या घरी गेली होती. तेव्हा तेथील अनुभव तिने शेअर केला होता. सय्यामी या पोस्टमध्ये लिहते, ‘जेव्हा मी पहिल्यांदा एके (अनुराग कश्यप)ला भेटले तेव्हा त्याने मला त्याच्या वर्सोवा येथील घरी बोलवले होते. त्यावर मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला चिंता करु नकोस माझे आई-वडिल माझ्यासोबत राहतात. त्याला बॅड बॉय ऑफ बॉलिवूड असे म्हटले जाते. काही लोकं त्याला तो ड्रग्ज घेतो आणि महिलांसोबत गैरवर्तन करतो म्हणून ओळखतात. जेव्हा मी पाहिलं तेव्हा तो खूप वेगळा असल्याचे मला जाणवले. कुठल्याही सामान्य घराप्रमाणेच तेथील वातावरण होते,’ असे
चोक्ड ऑफर झाल्यापासून ते रिलीज होईपर्यंत जवळपास तीन वर्षे मी त्याच्या सतत संपर्कात होते. दरम्यान मी अनुरागला ओळखू लागले. तो माझ्यासाठी एक मेंटॉर आणि चांगला मित्र झाला होता. माझ्या चांगल्या कामाची नेहमीच त्याने नेहमीच प्रशंसा केली.