ओळखलंत का तुमच्या लाडक्या अभिनेत्याला, करोनामुक्त होऊन केलाय कामाचा श्रीगणेशा

By  
on  

सध्या आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण कायम आहे. अनलॉकमध्ये सर्वांनीच  योग्य ती सर्व खबरदारी घेत हळूहळू कामाचा श्रीगणेशा केला खरा..पण त्यात असंख्य अडचणींचा सामनासुध्दा करावा लागला. यात मनोरंजन विश्वाला लागलेलं करोनाचं ग्रहण काही सुटलं नाही. 

अनेक कलाकारांना करोना झाल्याच्या बातम्या रोज चर्चेत आहेत. त्यापैकी मागच्याच महिन्यात मराठी सिनेसृष्टीचा आघाडीचा अभिनेता सुबोध भावेसह त्याच्या कुटुंबियांना करोना झाल्याचं समजलं.  आम्ही आवश्यक ती सर्व  काळजी घेते घरीच होम क्वारंटाईन असल्याचं सुबोधनेच सोशल मिडीयावरुन चाहत्यांना सांगितलं होतं. 

 

आता सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावेने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपण पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं सांगितलं आहे. म्हणजे सुबोध आता ठणठणीत असून त्याचा वर्कमोड पुन्हा ऑन झाला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mask and Work mode "ON" Captured by a dear friend @girijaoakgodbole

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

करोनामुक्त झाल्यानंतरचं सुबोधचं बहुधा हे पहिलंच प्रोजेक्ट असेल. विशेष म्हणजे ह्यात तो एका पंडीताच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळतोय. हा फोटो निरखून पाहिला तरच तो सुबोध आहे, हे लक्षात येतं. पण नेमका हा कोणता आगामी सिनेमा आहे, याबद्दलची माहिती त्याने गुलदस्त्यातच ठेवली. तसंच या प्रोजेक्टमध्ये अभिनेत्री गिरीजा-ओक गोडबोलेसुध्दा असणार आहे. कारण, या फोटोला सुबोधने तिचं सौजन्य दिलं आहे.  

लाडक्या सुबोध भावेच्या ह्या व्यक्तिरेखेविषयी आणि एकूणच त्याच्या या प्रोजेक्टविषयी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 
 

Recommended

Loading...
Share