By  
on  

ढसाढसा रडावसं वाटतंय, भरून आलंय....सिध्दूला अश्रू अनावर

गिरगाव परळमधील सांस्कृतिक घडामोडींचं महत्त्वाचं केंद्रबिंदू असलेला दामोदर हॉल रंगमंच बुधवारी 23 सप्टेंबर रोजी पाण्यात बुडाला. गेले दोन दिवस मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. याचाच हा परिणाम.  अगोदरच गेल्या पाच -सहा महिन्यांपासून नाट्यगृहाची किंबहुना नाट्यसृष्टीची आर्थिक बाजू करोनामुळे ढासळली असताना त्यात पावसाची भर. या नुकसानामुळे दुष्काळात तेरावा महिनाच ओढवला आहे. 

याच परिस्थिती पाहून मराठी सिनेसृष्टीतला आपला सिध्दू म्हणजेच अभिनेता सिध्दार्थ जाधवने एक भावनिक पोस्ट शेअर करत बंद असलेले नाट्यगृह पाहावत नाही, असं म्हटलं आहे. ही पोस्ट लिहताना आणि एकूणच नाट्यगृहाची अवस्था पाहून सिध्दूला अश्रू अनावर झाले आहेत. 

सिध्दू या पोस्टमध्ये भावूक होत म्हणतो, "शाळेच्या गॅदरिंगपासून ज्या स्टेजवर उभा राहयला शिकलो, नाटकं पाहीली, भरलेल्या प्रेक्षकांच्या साथीनं प्रयोग केले, त्या दामोदर नाट्यगृहाचे (परेल) असे फोटो पाहून ढसाढसा रडावसं वाटतंय, भरून आलंय...२०२० चा हा संकटकाळ अधिक कठीण होतोय ते पाहवत नाही. सर्वांसाठी प्रार्थना...काळजी घ्या"

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शाळेच्या गॅदरिंगपासून ज्या स्टेजवर उभा राहयला शिकलो, नाटकं पाहीली, भरलेल्या प्रेक्षकांच्या साथीनं प्रयोग केले, त्या दामोदर नाट्यगृहाचे (परेल) असे फोटो पाहून ढसाढसा रडावसं वाटतंय, भरून आलंय... २०२० चा हा संकटकाळ अधिक कठीण होतोय ते पाहवत नाही. सर्वांसाठी प्रार्थना...काळजी घ्या

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

 

गेल्या सहा महिन्यांपासून नाट्यगृह बंद आहे. त्यामुळे आधीच आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले आहे. तर बुधवारी पडलेल्या पावसाने झालेले नुकसान हे काही लाखांच्या घरात असू शकते. दरम्यान, कलाकारांना तसंच एखाद्या कलाकृतीपाठी झटणा-या हजारो-लाखो पडद्यामागच्या कलाकारांवर करोना महामारीमुळे उपासमारीची वेळ ओढवलीय, त्यात आता हे निसर्गाचं संकट. हे दृष्टचक्र कधी थांबतंय याच्याकडेच आता सर्वांचे डोळले लागले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive