Peepingmoon 2018 : काही ‘हटके सिनेमांनी गाजवलं हे वर्ष, बॉक्स ऑफिसवरही केली भरभक्कम कमाई

यावर्षी बॉक्स ऑफिसनेही काही अनपेक्षित निकाल दिले आहेत. २०१८ हे साल बिग बजेट सिनेमांसाठी फरसं लकी ठरलं नाही.

बघता बघता वर्षाअखेर आली आहे. यावर्षी बॉक्स ऑफिसनेही काही अनपेक्षित निकाल दिले आहेत. २०१८ हे साल बिग बजेट सिनेमांसाठी फरसं लकी ठरलं नाही. यावर्षी बिग बजेट सिनेमांनी दणकून आपटी खाल्ली तर काही कमी बजेट सिनेमांनी चांगला बिझनेस केला. पाहूया कोणते सिनेमे आहेत या यादीत

  • स्त्री- हा सिनेमा लक्षात राहतो तो श्रद्धा कपूरच्या अभिनयामुळे. वेगळी कथा आणि दर्जेदार अभिनय या दोन्ही कसोटींवर हा सिनेमा उतरला आहे.
  • बधाई हो- अत्यंत वेगळा विषय, सुरेख मांडणी आणि तोडीचे कलाकार यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला. या सिनेमाने जगभरात २०० कोटींचा व्यवसाय केला आहे.
  •   पद्मावत- वर्षाची सुरुवात या भव्य सिनेमाने झाली. सिनेमाचा सेट, रणवीरचा अभिनय आणि दिपिकाचं सौंदर्य या तिन्हीमुळे सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या सिनेमामुळे स्त्रीप्रधान सिनेमाद्वारे ३०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारी दिपिका पहिली अभिनेत्री आहे.

  • बागी २- अ‍ॅक्शन आणि मनोरंजन या दोहोंचा मिलाफ या सिनेमामध्ये होता. हा सिनेमा साजिद नाडियाडवाला आणि फॉक्स स्टार स्टुडिओची निर्मिती होता. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई १५० कोटी आहे.
  • सोनू के टिटू के स्वीटी- दोन मित्रांची गोष्ट असलेला हा सिनेमा ख-या अर्थाने सरप्राईज पॅकेज ठरला. या सिनेमातील गाण्यांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली.
  • गोल्ड- अक्षय कुमार अभिनित हा सिनेमा मौनी रॉयचा बॉलिवूड डेब्यु आहे. यात अक्षयने तपन दास नावाच्या हॉकी खेळाडूची भूमिका साकारली होती.
  • संजू- अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला. यामध्ये संजयची भूमिका रणबीरसिंगने केली होती. या सिनेमाने जवळपास ५०० कोटींचा बिझिनेस केला होता.

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of