आमीर खानच्या बागेत सापडलं असं काही की पोलिसही झाले हैराण

बॉलिवूडमध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, आमिरच्या घरातील बागेत गँगस्टरचं शव सापडल्याच्या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली.

बॉलिवूडमध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, आमिरच्या घरातील बागेत गँगस्टरचं शव सापडल्याच्या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली.

आमीरच्या वाडवडिलांचं उत्तर प्रदेशात भलं मोठं घर आहे. अख्तियारपूर नावाच्या गावात हे घर आहे. त्या घराच्या जागेतच आंबा आणि पेरुची बाग आहे. या बागेत सलीम उर्फ चच्चू याचं शव सापडलं. हे शव खुप दिवसांपूर्वीचं होतं. त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती.

पोलिस रेकॉर्ड्नुसार तीन आठवड्यांपूर्वी संबंधित व्यक्ती गायब झाल्याची नोंद आहे. याविषयी सर्वप्रथम आमीरच्या मुंबईमधील घरी एक फोन आला होता. आमीरच्या कुटुंबियांनी या फोनची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी मुंबई पोलिसांशी संपर्क केला असता ही घटना सत्य असल्या

चं समोर आलं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या फोनमुळे हा घटनाक्रम समोर आला.
आमीरच्या या वडिलोपार्जित घराची देखभाल सध्या नोकर चाकरांकडूनच केली जाते. या घराशी संबंधित असलेलं सगळं उत्पन्न आमीरकडे जातं. पण रविवारी तेथील लोकांना हे शव दिसल्यानंतर मात्र खळबळ उडाली.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of