Confirmed:अखेर टायगरला हिरोईन मिळाली! ‘बागी 3’मध्ये श्रध्दा कपूर

'बागी 3'मध्ये  हॅण्डसम हंक अभिनेता टायगर श्रॉफला अखेर हिरोईन मिळाली. सिनेमाच्या तिस-या भागात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार या चर्चांना उधाण आलं होतं.

‘बागी 3’मध्ये  हॅण्डसम हंक अभिनेता टायगर श्रॉफला अखेर हिरोईन मिळाली. बरेच दिवस या सुपरहिट सिनेमाच्या तिस-या भागात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आता अभिनेत्री श्रध्दा कपूरच्या नावावर ‘बागी 3’ची नायिका म्हणून शिक्कामोर्तब झालं आहे. ‘बागी’ सिनेमाच्या पहिल्या भागात झळकलेली श्रध्दा आणि टायगरची जोडी पुन्हा एकदा आपल्या केमिस्ट्रीचे जलवे दाखवायला सज्ज झाली आहे.

‘बागी’च्या दुस-या भागाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्माते सादिद नाडियाडवाला यांनी ‘बागी 3’ची घोषणा केली होती. ‘बागी’ आणि आगामी छिछोरेनंतर श्रध्दाचा साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत हा तिसरा सिनेमा आहे. श्रध्दा कपूर म्हणते,” मी बागी कुटुंबासोबत पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सुपर एक्साईटेड आहे. टायगरबरोबर पुन्हा काम करायला मिळतंय याचा आनंद आहे. साजिद सरांसोबत माझा हा तिसरा आणि अहमद सरांसोबत पहिलाच सिनेमा आहे. ‘बागी 3’ची स्क्रीप्ट अफलातून आहे. त्यामुळे या संपूर्ण टीमसोबत काम करायला मजा येणार.”

‘बागी 3’ हा सिनेमा पुढील वर्षी ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of