धमन्यात उसळतं रक्त, मनात देश प्रेम असा आहे अक्षयकुमारच्या केसरीचा टीजर

अक्षयकुमारचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणजे केसरी. हा सिनेमा शिखांच्या सारागढ़ी येथील लढाईवर बेतलेला आहे. या सिनेमात परिणीती चोप्राही अक्षयसोबत झळकणार आहे.

अक्षयकुमारचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणजे केसरी. हा सिनेमा शिखांच्या सारागढ़ी येथील लढाईवर बेतलेला आहे. या सिनेमात परिणीती चोप्राही अक्षयसोबत झळकणार आहे. अक्षय या सिनेमात हवालदार ईशरसिंगची व्यक्तिरेखा साकारत आहे. ईशरसिंग यांनी २१ शीख सैनिकांनासोबत घेऊन हजारो अफगाणी आक्रमणकर्त्यांना सळो कि पळो करून सोडलं होतं. याच ईशरसिंगची व्यक्तिरेखा अक्षय साकारत आहे.

अक्षय स्वत: या सिनेमाबाबत खुपच एक्साईटेड आहे. तो केसरीच्या टीमसोबत किंवा त्याच्या या लूकचे फोटो शेअर करत असतो. या व्यक्तिरेखेसाठी त्याने खास घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं आहे. या सिनेमाचं शूटींग जोधपूरमध्येही केलं होतं. अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका हातात तळपती तलवार तर एका हातात ढाल दिसत आहे. एकुणच काय अक्षयचा या सिनेमातील योद्ध्याचा लूक रसिकांना आवडेल यात शंका नाही. अक्षयसोबत या सिनेमात परिणीती चोप्रा दिसणार आहे. हा सिनेमा २१ मार्च २०२१मध्ये रिलीज होत आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of