आलियाने ‘कलंक’मधील नृत्यासाठी घेतलं बिरजू महाराजांकड़ून प्रशिक्षण

करण जोहरच्या ‘कलंक’ने प्रदर्शानापुर्वीच प्रसिद्धी मिळवण्यास सुरूवात केली आहे. या सिनेमाच्या टीझरलाही रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

करण जोहरच्या ‘कलंक’ने प्रदर्शानापुर्वीच प्रसिद्धी मिळवण्यास सुरूवात केली आहे. या सिनेमाच्या टीझरलाही रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. मनोवेधक टीझर नंतर या सिनेमातील गाणं रिलीज़ झालं आहे. यात आलिया-माधुरीच्या सौंदर्यासह त्यांचा पदन्यासही पहायला मिळणार आहे.

‘घर मोरे परदेसिया’ असे बोल असलेलं हे गाणं अत्यंत श्रवणीय आहे. या गाण्यातील आलियाचं नृत्य पाहूनतिने बराच काळ शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं असावं असं वाटणं सहाजिक आहे, पण हे खरं नाही. आलिया हे नृत्य बिरजू महाराजांकड़ून फक्त डॉन दिवसात शिकली आहे. असं असलं तरी नृत्यकुशल माधुरीसमोर टी जराही नवखी वाटत नाही.

यावर पीपिंगमूनशी बोलताना आलिया म्हणाली, ‘या गाण्यासाठी कथ्थकच्या बेसिक स्टेप्स शिकले होते, अदांसाठी मात्र बिरजूमहाराजांची मदत घेतली.’ रामायणाशी निगडीत असलेलं हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे. रेमो डिसूज़ा हे या गाण्याचे कोरीयोग्राफ़र आहेत.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of