‘कलंक’मधील आलियाच्या कथ्थक नृत्यावर माधुरी झाली खुश

‘कलंक’ची रुपवती आलियाने सिनेमात घर मोरे परदेसीया या गाण्यात कथ्थक नृत्य सादर केलं आहे. सिनेमातील हे गाणं नुकतंच उलगडलं. अखेर माधुरीचं मन जिंकण्यात आलिया यशस्वी ठरली.

करण जोहरच्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित मल्टीस्टारर ‘कलंक’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आणि इथे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली. ‘कलंक’ची रुपवती आलियाने सिनेमात ‘घर मोरे परदेसीया’ या गाण्यात कथ्थक नृत्य सादर केलं आहे. सिनेमातील हे गाणं नुकतंच उलगडलं. या कथ्थक नृत्य सादर करताना आलिया काहीशी दडपणाखाली होती. त्याला कारणही तसंच होतं डान्सिंग दिवा माधुरी दीक्षितसमोर तिला ते सादर करायचं होतं. पण अखेर माधुरीचं मन जिंकण्यात आलिया यशस्वी ठरली.

बॉलिवूडचा प्रसिध्द कोरिओग्राफर रेमो डिसूझाने नृत्यदिग्दर्शन केलेल्या या गाण्यात माधुरी आणि आलियाची मनमोहक अदा पाहायला मिळतात. ‘घर मोरे परदेसीया’ हे आलियाचं गाणं आहे आणि माधुरी त्याचा आस्वाद घेताना दिसतेय. सुंदर घागरा चोली परिधान केलेली आलिया या नृत्यावर हुस्नाबादच्या हिरामंडी रस्त्यावर थिरकतेय. पण माधुरीसमोर नृत्य करताना दडपणाखाली असलेली आलिया पिपींगमूनशी एक्सक्लुझिव्ह बोलताना म्हणते, “माधुरीजी यावेळेस नाचत नव्हत्या. पण माझ्या मनावर दडपण कायम होतं. पण माझ्या ह्या अवस्थेची त्यांना  कल्पना आली आणि मला खुप सहाय्य केलं. महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण गाणं संपल्यावर डबल थम्पसअप करत मला दाद दिली आणि मी भरुन पावले. ”

‘कलंक’ या मल्टिस्टारर सिनेमात आलिया प्रमुख व्यक्तिरेखा साकारतेय. माधुरी दीक्षित, संजय दत्त, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि आलिया अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात पाहायला मिळणार असून येत्या 17 एप्रिलला ‘कलंक’ प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of