अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा ‘बदला’, ही अभिनेत्री असणार सोबत

अमिताभ बच्चन चिरतरुण अभिनेते आहेत याबद्दल कुणाचंही दुमत नसावं. वयाच्या ७६ व्या वर्षीही ते तितक्याच उमेदीने काम करत आहेत.

अमिताभ बच्चन चिरतरुण अभिनेते आहेत याबद्दल कुणाचंही दुमत नसावं. वयाच्या ७६ व्या वर्षीही ते तितक्याच उमेदीने काम करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा झाली. बदला असं त्यांच्या आगामी सिनेमांचं नाव आहे.

या सिनेमात त्यांच्यासोबत तापसी पन्नू असणार आहे. तापसी आणि बिग बींनी ‘पिंक’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. शुजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेला पिंक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. बदला हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री असणार आहे. सुजॉय घोष या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं पोस्टर अलीकडेच प्रदर्शित झालं आहे. सुजॉयचाही हा अमिताभ यांच्यासोबत दुसरा सिनेमा आहे. या दोघांनी याआधी ‘अलादीन’ सिनेमात काम केलं आहे. आता बदला या सिनेमात हे दोघं काय कमाल दाखवतात ते कळेलच. हा सिनेमा ८ मार्चला प्रदर्शित होईल.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of