शाहरुख घेणार अमिताभ बच्चन यांचा ‘बदला’ ट्वीट करुन केलं जाहीर

सध्याच्या जमान्यात बॉलिवूड्कर एकमेकांचे सच्चे मित्र असतीलच असं नाही. अशातच ते एकमेकांचा बदला घेण्याची भाषा बोलू लागले तर? असंच काहीसं घडलंय अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानमध्ये.

सध्याच्या जमान्यात बॉलिवूड्कर एकमेकांचे सच्चे मित्र असतीलच असं नाही. अशातच ते एकमेकांचा बदला घेण्याची भाषा बोलू लागले तर? असंच काहीसं घडलंय अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानमध्ये.

शाहरुखने ट्वीट करत अमिताभ बच्चन यांचा बदला घेण्याचं जाहीर केलं आहे. अमिताभनेही या शाहरुखच्या इराद्याला जशास तसं उत्तर दिलं आहे. याला कारण आहे दोघांचा आगामी सिनेमा ‘बदला’. शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटने अजूर एंटरटेन्मेंटसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘बदला’ हा क्राइम- थ्रिलर असणार असून सुजॉय घोष याचे दिग्दर्शन करणार आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ आणि तापसी यांनी शुजित सरकारच्या ‘पिंक’ सिनेमासाठी एकत्र काम केलं होतं. त्यामुळे या सुपरहिट जोडीचं काम पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येणार आहे. उद्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of