भारतच्या सेटवर सलमान खानचा बोलबाला, सेटवर उभारली भली मोठी जिम

सलमान खानला फिट रहायचं किती वेड आहे ते सगळ्या बॉलिवूडला ठावूक आहे. त्यामुळे कितीही अडचणी असल्यातरी  सलमान रोजच्या रुटीनमध्ये जीमिंग सेशन अजिबात चुकवत नाही.

सलमान खानला फिट रहायचं किती वेड आहे ते सगळ्या बॉलिवूडला ठावूक आहे. त्यामुळे कितीही अडचणी असल्यातरी  सलमान रोजच्या रुटीनमध्ये जीमिंग सेशन अजिबात चुकवत नाही. सलमान सध्या भारतच्या शुटिंगमध्ये बिझी आहे.

२०१८ सलमानला फारसं बर गेलं नाही. कारण त्याला खूप मोठ्या अपेक्षा असलेला रेस ३ बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला. त्याचबरोबर रेस ४ मधूनही त्याला डच्चू दिल्याची चर्चा आहे. अशा वेळी सलमानला एका हिटची अत्यंत गरज आहे. त्यामुळेच तो भारतच्या शुटिंगवेळी जीवतोड मेहनत घेत आहे. इतकंच कशाला सिनेमात फिट दिसता यावं म्हणून त्याने सेटवर दहा हजार चौरस फुटाची जिम उभारली आहे.

 

ही जिम सलमानसाठी असली तरी भारतची टीम त्याचा वापर करु शकते. विशेष म्हणजे सलमानही शुटिंग नसेल त्यावेळी जिममध्ये असणं पसंत करतो. आता या जिमिंग मुळे सलमान किती फिट आहे हे सिनेमा पाहिल्यावर कळेलच. भारत येत्या ईदला प्रदर्शित होईल.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of