हार्दिक पांड्या आणि के एल राहुलला आगाऊपणा नडला: हॉटस्टारने ‘तो’ एपिसोड हटवला

‘कॉफी विथ करण’मध्ये अलीकडेच हार्दिक पांड्या आणि के एल राहूल हे क्रिकेटर्स आले होते. हे क्रिकेटर्स अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत.

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो कायमच चर्चेत असतो. या शोमध्ये येणारे सेलिब्रिटी किंवा त्यांच्या कमेंट्समुळे या शोच्या प्रसिद्धीत वाढच होत असते. पण या शोमध्ये अलीकडेच आलेल्या काही पाहुण्यांमुळे या शोची कुप्रसिद्धीच झाली आहे. ‘कॉफी विथ करण’मध्ये अलीकडेच हार्दिक पांड्या आणि के एल राहूल हे क्रिकेटर्स आले होते. हे क्रिकेटर्स अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत. पण या शोमध्ये चुकिच्या पद्धतीने दिलेल्या उत्तरांमुळे ही जोडगोळी चांगलीच अडचणीत आली आहे. हार्दिकवर बॅनिंगची टांगती तलवार आहे.

हा शो टेलिकास्ट झाल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मिडियावरून या दोघांची चांगलीच कानउघडणी केली होती. या दोघांनीही त्यानंतर माफीही मागितली होती. पण या दोघांवरचा प्रेक्षकांचा राग पाहता हॉटस्टारनेही हा एपिसोड काढून टाकला आहे.हार्दिकने महिलांविषयी मर्यादा सोडून आणि बेजबाबदार वर्तन विधान केल्याने त्याला जनक्षोभाला सामोरं जावं लागलं.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of