आज दीप-वीर होणार आयुष्यभरासाठी एकमेकांचे

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही सुपरहिट जोडी आज लग्नबंधनात अडकतेय. दोघांचाही विवाहसोहळा शाही पध्दतीने इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी पार पडत आहे.

बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही सुपरहिट जोडी आज लग्नबंधनात अडकतेय. दोघांचाही विवाहसोहळा शाही पध्दतीने इटलीतील लेक कोमो या शानदार आणि नयनरम्य ठिकाणी पार पडत आहे.

पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 13 आणि 14 नोव्हेंबर हे दीप-वीरच्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय दिवस ठरणार आहेत. या दोन दिवसांत त्यांचं लग्न हे विविध पारंपारिक आणि आकर्षक पध्दतीते अनेक विधी संपन्न करत मोठ्या थाटात पार पडणार आहे. आजपासून ही राम-लीलाची जोडी आयुष्यभरासाठी एकमेकांची होईल.

साखरपुडा, संगीत व त्यानंतर लग्न असा दीप-वीरचा हा सोहळा रंगणार असून हे लग्न दोन पध्दतीने होणार आहे. दीपिकाचे कुटुंबिय कोंकणी असल्याने एक कोंकणी पध्दतीने तर रणवीर सिंह सिंधी असल्याने सिंधी पध्दतीनेसुध्दा हे लग्न पार पडेल. बॉलिवूडचं हे सर्वात बिग फॅट वेडिंगची चाहत्यांमध्येसुध्दा प्रचंड उत्सुकता आहे.

पण महत्त्वाचं म्हणजे या लग्नसोहळ्यासाठी फक्त दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मोजकाच मित्रपरिवार निमंत्रित आहे. तसंच त्यांना लग्नसोहळ्यात मोबाईल फोन आणि कॅमेरा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. आपल्या खासगी लग्नसोहळ्याचे हे क्षण प्रसिध्दीमाध्यमांपर्यंत पोहचू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

सर्वांनाच आता या लग्नसोहळ्यातील एक तरी झलक पाहायला मिळावी म्हणून आतुरता लागून राहिली आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of