दीपिकाची बहिण अनिशा लग्नात मिरवतेय,आम्ही ‘लडकीवाले’

दीपिकाची लाडकी लहान बहिण अनिशासुध्दा मोठ्या बहिणीच्या लग्नात मिरवण्यासाठी सज्ज झाली आहे

दीपिका-रणवीरच्या आयुष्यातला तो अविस्मरणीय क्षण आता काही तासांवर येऊन ठेपलाय. सर्व जय्यत तयारी झालीय. पाहुण्यांची लगबग, यजमानांची घाई आणि साग्रसंगीत विधी पार पडत इटलीतील लेक कोमो येथे हा विवाहसोहळा संपन्न होत आहे.

दीपिकाची लाडकी लहान बहिण अनिशासुध्दा मोठ्या बहिणीच्या लग्नात मिरवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचे जिजू रणवीर सिंह यांनी सोशल मिडीयावर लडकेवाले असल्याची घोषणा केल्यानंतर आता सुपर एक्साईटेड अनिशानेसुध्दा आपण #Ladkiwale आहोत, असं सोशल मिडीयावर नाव अपडेट केलं आहे.

तुम्हाला माहितच असेल दीप-वीरच्या या शाही विवाहसोहळ्यातील एक झलक पाहण्यासाठी बॉलिवूडकर आणि चाहतेसुध्दा प्रचंड आतुर झाले आहेत. पण लग्नातील एकही फोटो किंवा व्हिडीओ प्रसिध्द होऊ नये म्हणून या लग्नात खास दक्षता घेण्यात आली आहे. पाहुण्यांनी मोबाइलमध्ये फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड करु नये म्हणून मोबाइलचा कॅमेरा झाकण्यासाठी त्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याचंही समजत आहे. येथे ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आली असून लेक कोमो परिसरात सुरक्षारक्षकांच्या बोटी गस्ती घालत आहे.

 

प्रत्येकाला विशिष्ट कोड असलेला इ-पासही देण्यात आला होता. या सोहळ्यात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीनं प्रवेश करू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं हा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of