15 नोव्हेंबर आहे दीप-वीरसाठी खास,रामला मिळाली त्याची लीला

तुम्हाला माहितीय का 15 नोव्हेंबर दीप-वीरसाठी किती खास आहे ते, या दिवशी लग्न करण्यामागे आहे एक महत्त्वाचं कारण.

दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे प्रेमवीर इटलीत शाही पध्दतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. काही तासांतच ते सात फेरे घेतील. 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 हे दिवस दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतील. पण तुम्हाला माहितीय का 15 नोव्हेंबर दीप-वीरसाठी किती खास आहे ते, या दिवशी लग्न करण्यामागे आहे एक महत्त्वाचं कारण.

जवळपास पाच वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित राम-लीला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून ही दीप-वीरची जोडी बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरतेय. त्यांची लव्हस्टोरीसुध्दा याच सिनेमापासून फुलत गेली. तर 15 नोव्हेंबरलाच रामलीला सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि आता दीपिका रणवीरसोबत 15 नोव्हेंबरलाच बोहल्यावर चढतेय. या दोन दिवसांत साखरपुडा, संगीत व त्यानंतर लग्न असा दीप-वीरचा हा सोहळा रंगणार असून हे लग्न दोन पध्दतीने होणार आहे. दीपिकाचे कुटुंबिय कोंकणी असल्याने एक कोंकणी पध्दतीने तर रणवीर सिंह सिंधी असल्याने सिंधी पध्दतीनेसुध्दा हे लग्न पार पडेल.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of