अक्षय ट्वींकलसाठी आनंद आणि सोनमने खास ठेवलं होतं एक लडकी को देखा तो ऐसा लगाचं स्क्रीनिंग

सोनम कपूर- राजकुमार राव अभिनीत एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमाचं खास स्क्रिनिंग काल पार पाडलं. या स्क्रिनिंगचे पाहुणेदेखील तितकेच खास होते.

सोनम कपूर- राजकुमार राव अभिनीत एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमाचं खास स्क्रिनिंग काल पार पाडलं. या स्क्रिनिंगचे पाहुणेदेखील तितकेच खास होते. सोनम आणि आनंदने अक्षय कुमार आणि ट्विंकल या जोडीला या स्क्रिनिंगसाठी आमंत्रित केलं होतं. यापूर्वी सोनम आणि अक्षयने एकत्र पॅडमॅन या सिनेमासाठी काम केलं आहे.

अक्षयने इन्स्टाग्रामवर या सिनेमाचं कौतुक केलं आहे. स्क्रीनिंग दरम्यान एका फोटोत सोनमसोबत असलेला अक्षय म्हणतो, ‘मी अजूनही सिनेमाबाबत विचार करत आहे. या महिलेला सलाम’. सोनमने स्क्रीनिंगवेळी निळ्या रंगाची मॅक्सी गाऊन घातला होत. सोनमचा हा लूक तिला ख-या अर्थाने स्टाईल आयकॉन बनवत होता.

 

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of