‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर रुपाली भोसले म्हणतेय ‘व्हूज नेक्स्ट’?

प्रेमभंग आणि फसवणुकीमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होते, त्यामुळेच तर प्रेम करा पण जरा जपून, असंच अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या शॉर्ट फिल्मद्वारे  सांगणार आहे.

प्रेमाचा गुलाबी रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. खास करून व्हेलेंटाईन डेच्या दिवशी तर हा रंग खूपच बहरतो. मात्र या रंगाला बट्टा लावणाऱ्या अनेक घटना समाजात घडतात. प्रेमभंग आणि फसवणुकीमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होते, त्यामुळेच तर प्रेम करा पण जरा जपून, असंच काहीसं मराठी आणि हिंदी अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या शॉर्ट फिल्मद्वारे  सांगणार आहे.

‘व्हूज नेक्स्ट’ या शॉर्ट फिल्मद्वारे ती प्रेक्षकांसमोर येत आहे. व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असलेला हा एक सस्पेन्स थ्रिलर हा शॉर्ट फिल्म आहे. हा एक स्त्रीप्रधान लघुपट असून, रुपालीने यात ‘मायरा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या लघुपटाद्वारे आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे ती सांगते. बलात्कार, ऍसिड हल्ला, छेडछाड यांसारख्या घटना वाढत आहे.

अशावेळी पिडीत मुलीने काय करावं? वर्षानुवर्षे कायद्याच्या कचाट्यात अडकून न्यायाच्या प्रतीक्षेत बसावं, कि अजून काही ठोस पाऊलं उचलावी ? यावर हा लघुपट भाष्य करणार आहे. प्रेम आंधळे नव्हे तर डोळस करण्याची आवश्यकता असल्याचा संदेश या सिनेमाद्वारे रुपाली देते. अभिजित चौधरी लिखित आणि दिग्दर्शित ‘व्हूज नेक्स्ट ?’ ही  शॉर्ट फिल्म युट्यूब वर पाहता येणार आहे.

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of