या दिवशी आहे ‘अप्सरा आली’चा ग्रँड फिनाले, विजेती कोण होणार याची चाहत्यांना उत्सुकता

झी युवावरील ‘अप्सरा आली’ हा शोदेखील रसिकांच्या लोकप्रियतेची पावती मिळवत आहे. या शोच्या फिनालेचा बिगुल आता वाजला आहे

झी वाहिनी रसिकांचं मनोरंजन करण्यात कायमच अग्रेसर राहिली आहे.  आता झी युवानेही हाच वसा जपला आहे. सध्या झी युवावरील ‘अप्सरा आली’ हा शोदेखील रसिकांच्या लोकप्रियतेची पावती मिळवत आहे. या शोच्या फिनालेचा बिगुल आता वाजला आहे. महाराष्ट्राची लोककला लावणी आणि इतर नृत्य प्रकारांवर आधारित १४ अप्सरांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम आता त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे . या शोचा फिनाले रविवारी १० मार्चला संध्याकाळी ७ वाजता आहे. टॉप फाईव्ह अप्सरांमध्ये ही महा अंतिम फेरी रंगेल.

अंतिम फेरीत मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे, साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार, डोंबिवली फास्ट किन्नरी दामा आणि पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे, पुण्याची मैना श्वेता परदेशी या अप्सरांचा समावेश आहे सुरेखा पुणेकर, सोनाली कुलकर्णी आणि दिपाली सय्यद या महा अप्सरांबरोबरच महागुरू सचिन पिळगावकरसुद्धा महा अंतिम फेरीचे परीक्षण करणार आहेत. या पाच सौंदर्यवतींमध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता रसिकांना आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of