Exclusive:अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नासाठी करण जोहर करणार दिग्दर्शन

करणने आतापर्यंत कधीच यापूर्वी अक्षय कुमारला किंवा ट्विंकल खन्नाला आपल्या कुठल्याच सिनेमासाठी दिग्दर्शित केलेलं नाही.

बॉलिवूड अभिनेत्री आणि सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आता संपूर्णपणे एक लेखिका म्हणून उद्यास आली आहे. ट्विंकलचं ‘फन्नी बोनस्’ हे पुस्तक तुफान बेस्टसेलर ठरलं. आता नुकतंच तिने ‘पाजामास् फॉरगिविंग’ हे तिसरं पुस्तक लॉन्च केलं. या पुस्तकाची ग्रॅण्ड पार्टी तिने आयोजित केली होती. या लॉन्चप्रसंगी पती अभिनेता अक्षय कुमार आणि बॉलिवूडमधील तिच्या अनेक दोस्तांनी हजेरी लावली आणि भरपूर एन्जॉय केलं.

पिपींगमून मराठीला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह बातमीनुसार या पार्टीच्या दुस-याच दिवशी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा अक्षय आणि ट्विंकल यांना एका जाहिरातीसाठी दिग्दर्शित करणार असल्याची माहिती मिळते आहे. करणने आतापर्यंत कधीच यापूर्वी अक्षय कुमारला आपल्या कुठल्याच सिनेमासाठी दिग्दर्शित केलेलं नाही. इतकंच नाही तर आपली लहानपणीची मैत्रीण आणि बोर्डिंग स्कूलची साथी ट्विंकलसोबत कुठलाच सिनेमा केलेला नाही. करणला खुप आधीपासूनच ट्विंकलसोबत सिनेमा करण्याची बरीच इच्छा होती, आता जेव्हा जाहिरातीच्या दिग्दर्शनाची ही संधी त्याला मिळाली तेव्हा त्याने ती हातची अजिबात सोडली नाही. या दोघांसोबत ही जाहिरात दिग्दर्शित करण्यास करण प्रचंड उत्सुक आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार,या जाहिरातीत करणला अक्षय आणि ट्विंकलची लव्ह केमिस्ट्री शूट करायची आहे. सुपरस्टार अक्षय आणि लेखिका ट्विंकल खन्ना यांना त्यांच्या ख-या व्यक्तिरेखेतच या जाहिरातीत पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षांपूर्वी ट्विंकलने करणच्या दिग्दर्शनातील सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. कुछ कुछ होता है सिनेमात करणने ट्विंकलला डोळ्यासमोर ठेऊन कथा लिहली होती. पण ट्विंकलला कथा पसंत न पडल्याने तिने नकार दिला आणि करणने निराश होत राणी मुखर्जीला सिनेमासाठी कास्ट केलं.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of