Exclusive Photo :पाहा शिवाजी महाराजांच्या लूकमधील रितेश देशमुख

स्वराज्याची स्थापना करणा-या शिवरायांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर भव्य-दिव्यपणे उलगडण्याचं शिवधनुष्य अभिनेता रितेश देशमुखने पेललं असल्याचे आपण सर्वच जाणतो.

श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आपल्या स्वराज्याची स्थापना करणा-या   शिवरायांचा इतिहास रुपेरी पडद्यावर भव्य-दिव्यपणे उलगडण्याचं शिवधनुष्य अभिनेता रितेश देशमुखने पेललं असल्याचे आपण सर्वच जाणतो. या मराठीतील आत्तापर्यंतच्या सर्वात बिग बजेट सिनेमात तो महाराजांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारतोय. रवी जाधव दिग्दर्शन करत असलेल्या महराजांच्या आयुष्यावरील या सिनेमाच्या प्रोजेक्टवर सध्या काम सुरु असून ह्यातील रितेश देशमुखचा लूक नुकताच पिपींगमून डॉट कॉमच्या हाती आला आहे.

काही महिन्यांपूर्वीच रितेशची हेअर स्टाईल आणि एकूणच दाढी-मिशी यासर्वांमध्ये मोठा बदल दिसून आला होता. तेव्हाच महाराजांच्या सिनेमासाटी रितेशची ही सर्व मेहनत सुरु असल्याची चर्चा रंगली होती. लय भारी आणि माऊलीनंतर मराठीतील हा त्याचा तिसरा सिनेमा असणार आहे. हा सिनेमा अॅक्शनने भरपूर आणि बाहुबलीपेक्षासुध्दा भव्य-दिव्य असणार असे बोलले जात आहे. तसंच मराठीनंतर हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमा हिंदीतही तयार होणार असल्याचे समजते.

सर्वांनाच आता रितेश देशमुखला महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी आणि  इतिहासाच्या त्या शौर्यगाथेला पडद्यावर पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी सारेच उत्सुक झाले आहेत.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of