‘कैसा ये प्यार है’ फेम अभिनेता इक्बाल खानचं मराठी सिनेमात पदार्पण

‘कैसा है प्यार है’ या टीव्ही मालिकेमुळे लोकप्रिय झालेला एक चेहरा म्हणजे इक्बाल खान. छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमधून त्याने आपल्या भूमिकांमधून छाप पाडली.

‘कैसा है प्यार है’ या टीव्ही मालिकेमुळे लोकप्रिय झालेला एक चेहरा म्हणजे इक्बाल खान. छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमधून त्याने आपल्या भूमिकांमधून छाप पाडली आहे. आता लवकरच तो मराठी सिनेमात पदार्पण करतोय. एका प्रसिध्द वृत्तपत्राने जेव्हा त्याच्याशी याविषयी बातचित केली तेव्हा तो म्हणाला, मराठी सिनेमात पदार्पण वगैरा असा मी कधी विचार केला नव्हता किंवा हेतूपूर्वक मी मराठी सिनेमात येईन असंही काहीच ठरवलं नव्हतं.पण आता मी ‘मुंबई आपली आहे’, या सिनेमात झळकणार आहे.

इक्बाल पुढे सांगतो, “मला या सिनेमाच्या स्क्रिप्ट वाचण्यातसुद्दा अजिबात रस नव्हता. पण मी फक्त माझा मित्र आणि अभिनेता राकेश बापटमुळेच ती स्क्रिप्ट वाचायला गेलो आणि नंतर ही भूमिका मी नाकरुच शकलो नाही. राकेशने मला फोनवर फक्त एवढंच समजावंल की मी दिग्दर्शक भारत सुनंदा यांचं म्हणणं एकदा ऐकून घ्यावं. आश्चर्य म्हणजे मी ते ऐकलं आणि नकळतच होकार कळवला. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला मराठी भाषा नीट येत नाही. पण मी प्रयत्न केलाय आणि यात मी महत्त्वपूर्ण भूमिका साकरतोय.

सर्वांनाच आता इक्बालच्या मराठी सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. त्याने यापूर्वी छोट्या पडद्यावरील कही तों होंगे, काव्यांजली, छुना है आसमान आणि वारिस यांसारख्या लोकप्रिय मलिकांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of