अभिनेत्री सुरभी हांडे पुण्यात विवाहबध्द,ढेपेवाडा येथे पार पडलं डेस्टिनेशन वेडींग

जय मल्हार या मालिकेत म्हाळसा देवी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडे पुण्यात विवाहबध्द झाली.

जय मल्हार या मालिकेत म्हाळसा देवी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडे पुण्यात विवाहबध्द झाली. काही महिन्यांपूर्वीच तिचा जळगाव येथे थाटात साखरपुडा संपन्न झाला होता. दुर्गेश कुलकर्णी यांच्यासोबत सुरभी विवाहबंधनात अडकली.

मुळशी येथील ढेपेवाडा येथे हे डेस्टिनेशन वेडींग शानदार पध्दतीत पार पडलं.

या विवाहसोहळ्यासाठी दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि खास मित्रपरिवार उपस्थित होता.

सुरभी मुळची जळगावची असल्याने तिचा साखरपुडा जळगावमध्ये संपन्न झाला होता.

सध्या सुरभीची कलर्समराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम ही मालिका प्रचंड गाजतेय. तसंच केदार शिंदे दिग्दर्शित अगंबाई अरेच्चा 2 या सिनेमातसुध्दा ती मह्त्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत झळकली होती.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of