‘मोलकरीण बाई’ मालिका येत आहे रसिकांच्या भेटीला, मालिकेच्या सेटवर होळीची धमाल

घरकामासाठी येणारी मोलकरीण बाई अनेक कुटुंबातील महिलांचा सर्वात मोठा आधार असतो. विशेषत: करीअरसाठी घराबाहेर असलेल्या स्त्रियांची मदार मोलकरीणबाईवरच अवलंबून असते.

घरकामासाठी येणारी मोलकरीण बाई अनेक कुटुंबातील महिलांचा सर्वात मोठा आधार असतो. विशेषत: करीअरसाठी घराबाहेर असलेल्या स्त्रियांची मदार मोलकरीणबाईवरच अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. त्या असतात म्हणून घरची सर्व धुरा त्यांच्या हाती सोपवून अनेकजणी निश्चिंत असतात.

घराघरात राबणा-या अशा अनेक मोलकरीणच्या आयुष्यावर आधारलेली नवीन मालिका ‘मोलकरीण बाई’ ही लवकरच ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. २५ मार्चपासून संध्याकाळी ६.३० वाजता ही मालिका प्रसारित होत आहे. या मलिकेच्या सेटवर नुकतंच होळी सेलिब्रेशन पहायला मिळालं. उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम या अभिनेत्रींनी या होळी सेलिब्रेशनमध्ये धमाल केली.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of