गोष्ट स्वप्नांच्या परिपुर्तीची, स्टार प्रवाहची नवी मालिका ‘साथ दे तू मला’

आजकालच्या स्त्रियांना स्वत:ची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. पण अशा वेळी घराच्या जबाबदा-या टाळून चालत नाहीत. ‘साथ दे तू मला’ मधली प्राजक्ताही अशाच अनेक स्त्रियांचा चेहरा आहे.

आजकालच्या स्त्रियांना स्वत:ची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. पण अशा वेळी घराच्या जबाबदा-या टाळून चालत नाहीत. ‘साथ दे तू मला’ मधली प्राजक्ताही अशाच अनेक स्त्रियांचा चेहरा आहे.

स्वप्न आणि जबाबदारी यांचा सुरेख मेळ घालणा-या प्राजक्ताची गोष्ट स्टार प्रवाहवरील ‘साथ दे तू मला’ ‘या नव्या मालिकेतून पहायला मिळणार आहे.  फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा असणाऱ्या प्राजक्ताला लग्नानंतरही आपल्या क्षेत्रात नाव कमवायचं आहे. यासाठी घर आणि करीअर या दोन्ही जबाबदा-या आनंदाने पेलायची तिची तयारीही आहे. यासाठी भावी पती तिला साथ देईल का हे मालिकेत पहायला मिळेल. अभिनेत्री प्रिया6का तेंडूलकर या मालिकेतून पदार्पण करत आहे. आशुतोष कुलकर्णी, सविता प्रभुणे, रोहन गुजर, प्रिया मराठे, पियुष रानडे हे कलाकार या मालिकेतून दिसतील. ११ मार्च संध्याकाळी ७.३० ला ही मालिका रसिकांच्या भेटीला येईल.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of