‘पेठ’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

नात्यातले अनुबंध जपत प्रेमाची अनोखी ‘पेठ’ उलगडणारा प्रेमपट लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे.

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. या भावनेचं महत्त्व प्रत्येकाच्या मनात वेगळं असतं. नात्यातले अनुबंध जपत प्रेमाची अनोखी पेठ उलगडणारा प्रेमपट लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. पोस्टर अनावरणाने या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. शारदा’ फिल्म प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या पेठ चित्रपटाचे निर्माते वीरकुमार शहा तर दिग्दर्शक अभिजित साठे आहेत.

प्रेम करणं ही एक सहजवृत्ती आहे. प्रेम निभावणं मात्र आज जिकरीची गोष्ट आहे. अशाच विखुरलेल्या विश्वातील सावरलेल्या प्रेमाची गोष्ट पेठ या चित्रपटात पहायला मिळणार असून वेगळ्या धाटणीची ही प्रेमकथा प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास दिग्दर्शक अभिजित साठे यांनी व्यक्त केला.

वृषभ शहा आणि नम्रता रणपिसे ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर येणार आहे. वृषभ शहा याला घरातून कलेचा वारसा मिळाला आहे तर नम्रता रणपिसे हिने आपल्या आवडीतून  स्ट्रगल करत चित्रपटसृष्टीची वाट चोखाळली आहे. यासोबत अभिषेक शिंदेराज खंदारेसंकेत कदम या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका असणार आहेत.

या चित्रपटाचे लेखन पटकथा-संवाद तसेच कलादिग्दर्शन अभिजित साठे यांचे आहेतपी.शंकर यांनी गीत-संगीताची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी गजानान शिंदे यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माते अविनाश जाधव आहेत.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of