प्रियांका चोप्राचा मराठी सिनेमा ‘फायरब्रॅण्ड’चा हा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

व्हेंटिलेटर या पहिल्या मराठी सिनेमाच्या निर्मितीनंतर प्रियांकाचा ‘फायरब्रॅण्ड’ हा दुसरा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

आज डिजीटल माध्यमाचं युग आहे. विविध निर्माते-दिग्दर्शक आपला सिनेमा थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्याऐवजी डिजीटल प्लॅटफॉर्मची निवड करतात. अशीच निवड ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधु चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. व्हेंटिलेटर या पहिल्या मराठी सिनेमाच्या निर्मितीनंतर प्रियांकाचा ‘फायरब्रॅण्ड’ हा दुसरा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

‘फायरब्रॅण्ड’ या मराठी सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारी एक महिला वकील आणि तिच्या आयुष्यातील व येणा-या केसेसच्या नातेसंबंधामधील गुतांगुत यावर हा सिनेमा गुंफण्यात आला आहे. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखिका-दिग्दर्शिका अरुणा राजे यांनी सांभाळली आहेत.

‘फायरब्रॅण्ड’ सिनेमात अभिनेत्री उषा जाधव महिला वकील म्हणून प्रेक्षकांसमोर येणार हे तर तिच्या पतीच्या भूमिकेत अभिनेते गिरीश कुलकर्णी आहेत. तसंच अभिनेते सचिन खेडेकर आणि अभिनेत्री राजेश्वरी सचदेव यांना आजच्या युगातल्या उच्चभ्रू समाजातील पती-पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळेल.

येत्या 22 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर ‘फायरब्रँड’ हा सिनेमा प्रदर्शित होईल.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of