‘चला हवा येऊ द्या’मध्ये रंगणार रात्रीचा खेळ

येत्या भागात ही धम्माल आपल्या कल्पनेपलिकडची आणि अफलातून असणार आहे. त्याला कारणही तसंच आहे, ते म्हणजे 'चला हवा येऊ द्या'च्या भागात 'रात्रीस खेळ चाले'चे सर्व कलाकार अवतरणार आहेत.

काय मंडळी हसताय ना,हसायलाच पाहिजे म्हणून अवघ्या महाराष्ट्रात आणि आता परदेशातही धुमाकूळ घालणा-या आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर नेहमीच धम्माल उडते. पण येत्या भागात ही धम्माल आपल्या कल्पनेपलिकडची आणि अफलातून असणार आहे. त्याला कारणही तसंच आहे, ते म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’च्या भागात ‘रात्रीस खेळ चाले’चे सर्व कलाकार अवतरणार आहेत.

आत्ता थुकरटवाडीत नाईक कुटुंब, त्यांची पिलावळ आणि सोबतीला शेवंता येणार म्हटल्यावर घाबरगुंडी तर उडणारच ना. पण त्यांना टक्कर द्यायला थुकरटवाडीतलं नाईक कुटुंब मात्र सज्ज झालं आहे. कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे,तेजपाल वाघ यांचा कोकणी बाज आणि कटकारस्थानं पाहण्याची प्रचंड उत्सुकता सर्वांना आहे.

शेवंता,माधव,छाया,दत्ता,अण्णा,माई आणि पांडू ही धम्माल पात्र खरी पात्रं साकारणा-या कलाकारांसमोर सादर करताना काय काय मज्जा होणार आणि सर्व कसे पोट धरुन हसणार हे पाहणं जबरदस्त ठरणार आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of