झोकात पार पडलं सखी-सुव्रत या नवदांपत्याचं रिसेप्शन, या कलाकारांची हजेरी

मराठी सिनेसृष्टीतील हॅपनिंग कपल सखी गोखले आणि सुव्रत जोशी नुकतेच विवाहबंधनात अडकले. सखी सुव्रतच्या लग्नाच्या फोटोवर नेटिझन्सनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील हॅपनिंग कपल सखी गोखले आणि सुव्रत जोशी नुकतेच विवाहबंधनात अडकले. सखी सुव्रतच्या लग्नाच्या फोटोवर नेटिझन्सनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. आता या जोडीच्या रिसेप्शनचे फोटो समोर येत आहेत. काल मुंबईत पार पडलेल्या या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, प्राजक्ता माळी, सुयश टिळक, अभिजीत खांडकेकर यांचा समावेश होता.

दिल दोस्ती दुनियादारी मालिकेनिमित्त हे दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात कधी पडले, हे त्यांनासुध्दा कळलं नाही. हे दोघंही नेहमीच एकमेकांसोबत फिरण्याचे आणि मस्ती मूडमधले फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच सुव्रतने सखीच्या एका फोटोला आय लव्ह हर, अशी कमेंट दिली होती. त्यावरून हे दोघं रिलेशनशीप असल्याचं समोर आलं होतं.

सखी सुव्रतच्या रिसेप्शनचे फोटो शेअर करून अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादने उत्तम कॅप्शन देत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

सुयशने टिळकनेही सोहळ्याचा फोटो शेअर करत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

सखीने नुकतंच विवाह नोंदणी करतानाचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of