‘विठ्ठल’मध्ये झळकणार श्रेयस तळपदे

ढोल ताशाच्या गजरात माऊलीला वंदन करताना श्रेयस तळपदे दिसत आहे, त्यामुळे 'विठ्ठल' सिनेमात श्रेयस तळपदे नेमक्या कोणत्या भूमिकेमधून दिसून येणार?

महाराष्ट्रचे आराध्यदैवत आणि अखंड वारकरी समुदायाच्या लाडक्या विठूमाऊलीवर आधारित ‘विठ्ठल’ या सिनेमाची चर्चा सवर्त्र जोरदार सुरु आहे. कंबरेवर हात ठेऊन विटेवर उभा असणाऱ्या माऊलीचे मनुष्य रूप दाखवणाऱ्या या सिनेमाचा  नुकताच सोशल नेटवर्किंग साईट वर टिझर प्रदर्शित करण्यात आला.
राजीव रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन तसेच टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाच्या टिझरमध्ये सुरुवातीला भव्यदिव्य विठ्ठलाची मूर्ती दिसून त्यावर अभिराचा वर्षाव होत ढोल ताशाच्या गजरात माऊलीला वंदन करताना श्रेयस तळपदे दिसत आहे, त्यामुळे या सिनेमात ढोल ताशाच्या गजरात माऊलीला वंदन करताना श्रेयस तळपदे दिसत आहे, त्यामुळे ‘विठ्ठल’ सिनेमात श्रेयस तळपदे नेमक्या कोणत्या भूमिकेमधून दिसून येणार? भूमिकेमधून दिसून येणार? असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.
‘विठ्ठल’ नामाचा गजर करणाऱ्या या सिनेमाची दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी निर्मिती केली आहे. ‘विठ्ठल’ या सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंडवते यांनी संवादलेखन केले आहे.विठ्ठलाच्या भूमिकेत सचित पाटील दिसणार असून त्यांच्या जोडीला हर्षदा विजय ही नवोदित अभिनेत्रीदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच अशोक समर्थ, भाग्यश्री मोटे, दीप्ती धोत्रे आणि हितेन तेजवानी या कलाकारांचादेखील यात समावेश आहे.
आजच्या आधुनिक युगात देव आणि भक्त यांच्यामधील नातं सांगणारा ‘विठ्ठल’ हा सिनेमा ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of