सुव्रत जोशी आता गाणार तामिळ गाणं, पाहा काय सांगतो या अनुभवाबद्दल

सुव्रत जोशी हे नाव आपल्यासमोर ‘दिल दोस्ती आणि दुनियादारी’मधून आलं. त्यातील सुजय नावाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारली होती. सुव्रत आता ‘डोक्याला शॉट’ या सिनेमातून आपल्या भेटीला येत आहे.

सुव्रत जोशी हे नाव आपल्यासमोर ‘दिल दोस्ती आणि दुनियादारी’मधून आलं. त्यातील सुजय नावाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारली होती. सुव्रत आता ‘डोक्याला शॉट’ या सिनेमातून आपल्या भेटीला येत आहे. यात तो प्राजक्ता माळी हिच्यासोबत झळकणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात तो केवळ अभिनय करणार नाही तर गाणार ही आहे. सुजय गात असलेलं गाणं मराठी नाही तर तमिळ आहे.

सुव्रत पहिल्यांदाच एखाद्या सिनेमात गाणं गात असल्याने हा अनुभव त्याच्यासाठी खुप खास आहे. या अनुभवाबद्द्ल सुजय म्हणतो, करीअरच्या सुरुवातीला मी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यावेळी अ‍ॅक्रोबॅटीक्स पण करायचो. त्याचवेळी काही काळ संगीतही शिकत होतो. मला स्वत:ला चॅलेंज करायला आवडायचं. त्यामुळेच हे तमिळ भाषेतील गाणं गायला मी तयार झालो.
हे गाणं खडान खडा पाठ केलं, जेणेकरून सुर ताल इकडे तिकडे झाले तरी चालतील पण गाण्यातील शब्दांचा अर्थ बिघडायला नको’. सुव्रतचा ‘डोक्याला शॉट’ हा सिनेमा १ मार्चला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of