कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार हे तीन मराठी सिनेमे

कान्स फिल्म फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. या फेस्टिवलचे यंदा ७४वे वर्ष आहे. गेले काही दिवस हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी या मानाच्या फिल्म फेस्टिवलला हजेरी लावत आहेत

कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. या फेस्टिवलचे यंदा ७४वे वर्ष आहे. गेले काही दिवस हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी या मानाच्या फिल्म फेस्टिवलला हजेरी लावत आहेत. या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिवलमध्ये तीन मराठी सिनेमेसुद्धा झळकणार आहेत. ‘आराॅन’, ‘दिठी’ आणि ‘बंदिशाळा’ हे तीन मराठी सिनेमे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सिनेप्रेमींना पाहायला मिळणार आहेत.

ज्येष्ठ कलाकार मोहन आगाशे आणि सुमित्रा भावे यांचा ‘दिठी’, मिलिंद लेले यांचा ‘बंदिशाळा’ आणि ओमकार शेट्टी यांचा ‘आराॅन’ या तीन सिनेमांनी या फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्थान पटकावले आहे. या सिनेमांतील प्रत्येकी २ सदस्य या फेस्टिव्हलला उपस्थित राहू शकतात.

१३ ते २२ मे दरम्यान फ्रान्समध्ये यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होत आहे. हा फिल्म फेस्टिव्हल जगातला एक मानाचा फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of