‘ती and ती’च्या स्किनिंगवेळी लावली या कलाकारांनी हजेरी, पाहा कोण-कोण आहेत ते

पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ती and ती’ हा अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे आणि या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. 

पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ती and ती’ हा अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे आणि या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे.

सई आणि प्रियांकाच्या मध्ये अडकलेल्या अनयची धमाल गोष्ट या सिनेमात दिसून येत आहे.

या सिनेमाचं स्क्रिनिंग नुकतंच पार पडलं आहे. या स्क्रिनिंगला सई लोकूर, स्मिता गोंदकर, मेघा धाडे या पुष्करच्या बिग बॉसमधील मैत्रिणी यावेळी उपस्थित होत्या.

याशिवाय श्रेयस तळपदे, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ जाधव, पुष्कर श्रोत्री, स्वप्ना वाघमारे-जोशी, परी तेलंग, माधव देवचके हे कलाकार उपस्थित होते.

आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

पुष्कर जोग, वैशाल शाह, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of