‘ती & ती’ सिनेमात सोनाली कुलकर्णीचा हॉट आणि सेन्शुअस अंदाज

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती & ती’ या सिनेमाची सर्वत्र उत्सुकता आहे. पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. 

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती & ती’ या सिनेमाची सर्वत्र उत्सुकता आहे. पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. या अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमाच्या ट्रेलरमधून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा बोल्ड आणि हॉट अवतार पाहायला मिळाला.

प्रेमाचा लव्ह ट्रँगल, एक आगळीवेगळी इंटरेस्टिंग स्टोरी आणि त्याचसोबतीला चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांची होणारी लंडन सफारी या सर्व गोष्टींमुळे पुष्की उर्फ पुष्कर जोग, प्रार्थना बेहरेआणि सोनाली कुलकर्णी यांचे फॅन्स देखील ‘ती & ती’ साठी खूपच जास्त आतुर झाले आहेत. भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती & ती’ चित्रपट येत्या १ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

सोनालीने या लूकसोबत एक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर करत, जाळ अन् धूर संगटच असं म्हटलंय. तिच्या चाहत्यांना या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of