तुला पाहते रे: ईशा-विक्रांतच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं ना?

विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकरचे लग्न. अनेक अडथळे पार करत अखेर ठरलं हो ठरलं !

बरेच दिवस छोट्या पडद्यावर सुरु असलेली एक महत्त्वाची चर्चा म्हणजे विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकरचे लग्न. अनेक अडथळे पार करत अखेर ठरलं हो ठरलं ! प्रेमाला वयाचं बंधन नसतं, हे सिध्द करत लवकरच विक्रांत आणि ईशा विवाहबंधनात अडकणार आहेत. सर्वांनाच या शाही विवाहसोहळ्याची प्रचंड उत्सुकता आहे.

या लग्नाची बोलणी झाली असून ईशाला सरंजामे कुटुंबियांनी सून म्हणून स्विकारलं असून तिला ‘टिळा’ लावण्याचा कार्यक्रम देखील पार पडला आहे. सरंजामे आणि निमकर ही दोन्ही कुटुंबिय या लग्नामुळे अगदी खुशीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

ईशा-विक्रांतच्या लग्नाची सर्व जबाबदारी सरंजामे यांची मॅनेजर मायराला देण्यात आली. तिने या शाही लग्नासाठी डेस्टिनेशन वेडींगचे अनेक पर्याय सरंजामे आणि निमकर कुटुंबियांसमोर ठेवले. पण मराठमोळ्या लग्न विधींकरता विक्रांत सरंजामे यांनी महाराष्ट्रातील भोर या ठिकाणची निवड लग्नासाठी केली आहे.

ही लगीनघाई सुरू असतानाच ईशा आणि विक्रांत यांच्या शाही लग्नाची शाही पत्रिका समोर आली आहे. निमकरांनी आपल्या ऐपतीप्रमाणे 160 रुपयांची पत्रिका निवडली होती पण सरंजामे कुटुंबायांनी निवडलेली ही पत्रिका तुम्ही अवाक् व्हाल एवढं मात्र नक्की! सर्वांना या शाही लग्नसोहळ्याचं  13 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी 7 वा. झी मराठीवर आग्रहाचं निमंत्रण आहे.

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of