होळीचा रंग चढला ‘स्माईल प्लीज’च्या कलाकारांवरही, पाहा फोटो

फॅशन डिझायनर, दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं आहे. ‘स्माईल प्लीज’ हा विक्रम यांचा दुसरा मराठी सिनेमा आहे.

फॅशन डिझायनर, दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं आहे. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच अभिनेता ह्रतिक रोशनच्या हस्ते पार पडला. मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, आदिती गोवित्रीकर अशी एकापेक्षा एक सरस मराठी कलाकार या सिनेमासाठी एकत्र येत आहेत. ‘स्माईल प्लीज’ हा विक्रम यांचा दुसरा मराठी सिनेमा आहे. त्यापूर्वी त्यांनी ‘हृदयांतर’ या सिनेमाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.
सध्या या सिनेमात होळीचा सीन शूट केला जात आहे. त्यात होळीचा माहोल सर्वत्र असल्याने कलाकारांनीही हे शूटिंग एंजॉय केलं. या सिनेमात ललित प्रभाकर आणि मुक्ता बर्वे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of