क्रिकेट खेळणार सरंजामे कुटुंबीय, पण डाव रंगणार विक्रांत सरंजामेचा

 झी मराठीवरील तुला पाहते रे मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. पूर्वी सालस वागण्याने प्रत्येकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणारा विक्रांत ख-या अर्थाने व्हिलन असल्याचं समोर आलं आहे.

झी मराठीवरील तुला पाहते रे मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. पूर्वी सालस वागण्याने प्रत्येकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणारा विक्रांत ख-या अर्थाने व्हिलन असल्याचं समोर आलं आहे. पण या वस्तुस्थितीपासून झेंडे वगळता इतर कुटुंबीय अनभिज्ञ आहे.

ईशालाच राजनंदिनी सिद्ध करण्याचा विक्रांतचा आटापिटा सुरु आहे. त्यामुळेच राजनंदिनीशी जोडली गेलेली प्रत्येक आठवण तो इशावर आजमावत आहे. मग ते इशाचे मार्क वाढवण्याचा प्रसंग असो किंवा कंपनीमधील कामगारांच्या प्रश्नांविषयीचा मुद्दा. इशा हीच मागच्या जन्मीची राजनंदिनी आहे हे सिद्ध करणं हाच जणू विक्रांतचा अजेंडा बनला आहे. अशातच इशा सरंजामे कुटुंबियांनी क्रिकेट खेळावं असं सुचवते. एका रविवारी क्रिकेटचा सामना रंगतोही. पण इशा पडल्यावर विक्रांत तिला राजनंदिनी म्हणून हाक मारतो. विक्रांतच्या या वागण्याने सगळेच अचंबित होतात. पुढे काय होतं हे समजण्यासाठी पाहा ‘तुला पाहते रे’ सोम-शनि रात्री ८.३० वाजता झी मराठीवर

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of